AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?

| Updated on: Jun 17, 2026 | 7:17 PM
Share

चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर विभागीय आयुक्तांनी नव्या गटनेत्याबाबत अधिकृत आदेश पारित करत सुरेंद्र आडबाले यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

याआधी वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर हे गटनेते म्हणून कार्यरत होते. मात्र आता त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रतिभा धानोरकर गटाचे सुरेंद्र आडबाले यांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

काल प्रतिभा धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी गटनेता बदलण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पत्र दिले होते. त्यानंतर आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सुरेंद्र आडबाले यांच्या निवडीमुळे धानोरकर गटाची ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी महापालिका राजकारणावर या बदलाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 17, 2026 07:17 PM

Follow Us