AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?

केरळम्’चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे… चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 18, 2026 | 6:55 PM
Share

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांच्यावर तिरंग्याच्या केकचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. बावनकुळे यांनी चेन्निथलांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. तर काँग्रेसने भाजपने राष्ट्रप्रेमाचे धडे शिकवू नयेत असे प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. चेन्निथला यांनी तिरंग्याच्या प्रतिमेचा केक कापला असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले असून, चेन्निथला यांनी देशाची माफी मागावी आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. बावनकुळे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी असेही आवाहन केले आहे.

या आरोपांवर काँग्रेसकडून तीव्र प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपने आम्हाला वंदे मातरमचे महत्त्व सांगू नये, असे काँग्रेसने म्हटले आहे. ज्यांनी कधी तिरंगा खांद्यावर घेतला नाही, त्यांनी तिरंगा प्रेम शिकवू नये, असा पलटवार काँग्रेसने केला. भाजपकडून केला जाणारा हा कांगावा अत्यंत चुकीचा असून, काँग्रेसचे राष्ट्रप्रेम दुटप्पी असल्याचा भाजपचा आरोप चुकीचा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. भाजपकडून हे एक ‘नरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न केला जात असून, देशाचे नागरिक यापासून सावध राहायला हवेत, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

Published on: Aug 18, 2026 06:55 PM

Follow Us