Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी फुलांनी सजलं, बघा नजरेत भरणारं ड्रोन व्ह्यू
छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 395 वी जयंती साजरी केली जात असल्याने शिवनेरी किल्ल्यावर या दिमाखदार सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जयंती सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं एक अलौकिक रत्न, माँसाहेब जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्माला आलेला मराठी मुलुखाचा अभिमान, समस्त मराठीजणांचा स्वाभिमान, ज्यांनी इथल्या रयतेला स्वराज्य दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवनेरीसह संपूर्ण राज्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे इतरही मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा देखील जोजावण्यात आला. तर किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त अनेक शिवभक्त, शिवप्रेमी मोठ्या संख्येने किल्ले शिवनेरीवर दाखल होत असून शिवजन्मोत्सवाचा मोठा उत्साह आज पाहायला मिळतोय. यासह किल्ले शिवनेरीवर विविध साहसी खेळ देखील यावेळी सादर करण्यात आले.