Vidhan Bhavan Rada : विधानभवनाच्या लॉबीतील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्…
विधानभवनाच्या लॉबीत राडा झाला आणि त्या राड्याचे रात्रभर पडसाद उमटले. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या लॉबीत भिडले. आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली आहे. नितीन देशमुख यांच्यावरील कारवाई नंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. पोलिसांच्या गाडी समोरच आव्हाडांनी कार्यकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलन केलं.
नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. पोलिसांच्या गाडी समोरच आव्हाडांनी कार्यकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलन केलं. आव्हाडांचे कार्यकर्ते देशमुख यांना पोलीस घेऊन जात होते त्यावेळेला आव्हाडांनी ठिय्या दिला मग पोलिसांच्या गाडी खालीच शिरून आव्हांनी पोलिसांची गाडी रोखली. विधानभवन परिसरात झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. राड्यानंतर आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना पोलिसांनी रात्री बारा वाजता भवनातून अटक केली. आव्हाडांना हे कळताच ते तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले. आव्हाडांनी पोलिसांच्या गाडी समोरच ठिय्या दिला. ‘खुनाचे आरोपी, मोककाचे आरोपी आतमध्ये घुसून मारतात ते आहे कुठे? हे बिचारे पोलीस तरी काय करणार? हे हुकुमाचे बिचारे ताबेदार आहेत. पण मोककाचा आरोपी लपवला जातोय. खुनाचा आरोपी लपवला जातोय हे महाराष्ट्राला समजून द्या’, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

