Exclusive VIDEO : शिवसेना भवनासमोर शिवसेना-भाजप हाणामारीचा पहिला व्हिडीओ

शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनाही काठीने मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

मुंबई : भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. मात्र, शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि त्याब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. मात्र, दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनाही काठीने मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी शिवसेना आता त्यांच्याविरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI