AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Clash in Mahad : रिव्हॉल्वर दाखवलं... गोगावले अन् तटकरेंच्या समर्थकांमध्ये तुफान राडा, 50-60 जणं अंगावर धावले अन्...महाडमध्ये घडलं काय?

Clash in Mahad : रिव्हॉल्वर दाखवलं… गोगावले अन् तटकरेंच्या समर्थकांमध्ये तुफान राडा, 50-60 जणं अंगावर धावले अन्…महाडमध्ये घडलं काय?

| Updated on: Dec 02, 2025 | 4:55 PM
Share

महाडमध्ये भारत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यात रिव्हॉल्वर दाखवल्याचा आणि मारहाणीचा आरोप आहे. विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे यांना मारहाण केल्याचा, तसेच वाहनांची तोडफोड झाल्याचा आरोपही करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

महाडमध्ये भारत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर हा राजकीय तणाव वाढल्याचे दिसत आहे. या घटनेत मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाने रिव्हॉल्वर दाखवल्याचा आरोप केला आहे, तर तटकरे समर्थक सुशांत जाबरे यांना मारहाण झाल्याचा आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या या हाणामारीत मोठी गोंधळ निर्माण झाला. माहितीनुसार, सुशांत जाबरे यांच्या अंगरक्षकालाही मारहाण करण्यात आली आणि त्यांचा रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवले. महाडमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता पोलिसांनी परिसरात रूट मार्च काढला. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Published on: Dec 02, 2025 04:55 PM