Devendra Fadnavis on Saif Attack : सैफवरील हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मुंबई असुरक्षित…’
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. सैफवर या व्यक्तीकडून चाकूने ६ वार करण्यात आले. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्याच्या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. सैफवर या व्यक्तीकडून चाकूने ६ वार करण्यात आले. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्याच्या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधकांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत’, असे फडणवीस म्हणाले तर पोलिसांनी या घटनेबाबतची सर्व माहिती दिली आहे. या पाठीमागे कशाप्रकारचा मोटीव असू शकतो, हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आरोपी कुठून आला हे देखील पोलिसांनी सांगितलं आहे. आता पूर्ण कारवाई सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढे देवेंद्र फडणवीस पुढे असेही म्हणाले, “मला असं वाटतं की देशातील मेगासिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की, कधीकधी काही घटना घडतात. त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं योग्य होणार नाही. याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण मुंबई अधिक सुरक्षित राहायला पाहिजे या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

