AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा, मराठा समाजाला दोन टप्प्यात मिळणार आरक्षण

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा, मराठा समाजाला दोन टप्प्यात मिळणार आरक्षण

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Oct 30, 2023 | 2:07 PM
Share

CM Eknath Shinde on Maratha Reservation : मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाचा प्रश्न १९८० सालापासून आहे. मात्र देण्याची तत्परता ज्यावेळी देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण दिलं आणि ते उच्च न्यायालयात टिकलं मात्र दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही, हे कटू सत्य आहे. आम्ही देणारे आहोत म्हणून आम्ही मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एक म्हणजे शिंदे समितीच्या माध्यमातून आम्ही आरक्षण देणार आहोत. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही शिंदे समितीचा अहवाल स्वीकारणार आहे. हा अहवाल स्वीकारल्यानंतर महसूल ममंत्री जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून कागदपत्र तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

Published on: Oct 30, 2023 02:07 PM

Follow Us