देवेंद्र फडणवीस जे बोलले त्यामागे नक्कीच तथ्य…, ‘महाराष्ट्राचा महासंकल्पा’तील गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
VIDEO | ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमातील देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प या ‘टीव्ही 9 मराठी’च्या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर अनेक गौप्यस्फोट केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते राजकीय नाट्य बघायला मिळालं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. विशेष म्हणजे त्यावेळी तयार झालेलं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही तासांच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत फडणीस-अजित पवार यांना जास्त माहिती आहे. देवेंद्र फडणवीस उगाच असं बोलणार नाही त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
