CM Shinde: पूरग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा; शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारांपर्यंतचे अनुदान
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दिलासा दिलेला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत अनुदान देणार आणि प्रोत्साहनपर अनुदान मिळवताना अडचणीच्या जाचक अटी बदलणार असेही ते म्हणाले. शाशन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश शिंदेंनी दिल्याचे समोर आले आहे. यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे […]
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दिलासा दिलेला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत अनुदान देणार आणि प्रोत्साहनपर अनुदान मिळवताना अडचणीच्या जाचक अटी बदलणार असेही ते म्हणाले. शाशन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश शिंदेंनी दिल्याचे समोर आले आहे. यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी प्रोत्साहनपर अनुदान मिळविण्यासाठी काही जाचक अटी होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते, मात्र आता या अटी तात्काळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
