Special Report | दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार!
शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा म्हटला की राजकीय समाचार हा आलाच. शिवसेना आणि पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारीदेखील झाली आहे.
शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा म्हटला की राजकीय समाचार हा आलाच. शिवसेना आणि पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारीदेखील झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या धडाडणार आहे. दसरा मेळाव्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार का? असा सवाल केला जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, असं सांगत या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचंच राऊत यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं आहे.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

