शिंदे अन् भाजपात इशारों-इशारो में कोल्डवॉर? ‘ही’ आहेत प्रमुख 2 कारणं; बघा गेल्या 15 दिवसांपासूनची इनसाईड स्टोरी
मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे आणि या चर्चेला अलीकडच्या भेटीगाठी आणि आपत्ती प्राधिकरणाच्या नियुक्ती वादावरून अजून हवा मिळालीये. नेमकं काय घडतंय पडद्यामागे....
प्रचंड बहुमताच्या महायुती सरकारमध्ये सध्या चाललय काय हा प्रश्न अनेक राजकीय जाणकारांना सुद्धा पडतोय. एका आपत्ती समिती वरून शिंदे भाजपात कोल्ड वॉरचा बिगुल वाजल्याचे दावे होत आहेत. मात्र क्रोनोलॉजी बघितल्यास इशारे इशारोंमधल्या या कोल्ड वॉरची मुहूर्तमेढ नव्या सरकारच्या जन्मावेळीच रोवली गेली. आता फक्त आपत्ती समितीच्या निमित्ताने या कोल्ड वॉरमधल्या मतभेदाच्या ठिणग्या दिसू लागल्यात. सरकार स्थापनेवेळी शिंदे यांचे नेते पुन्हा मुख्यमंत्रीपदी शिंदेंना पाहण्यासाठी इच्छुक होते. तेव्हा शिंदे यांच्या नाराजीच्याही चर्चा रंगल्या आणि नव्या सरकारच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या विधानाने त्यावर शिक्कामोर्तब झालं. यापुढच्या अनेक कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे गैरहाजर राहिले. शिंदे यांच्या टर्ममधल्या अपात्र लाडक्या बहिणींना कात्री लावावण्याचा निर्णय घेतला गेला. नंतर त्यांच्याच टर्ममधील ज्येष्ठ नागरिक तीर्थस्थळ योजनेबद्दल पुनर्विचाराची चर्चा रंगली.
लोकसभेला भाजपसाठी महायुतीला पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभा येईपर्यंत मात्र दूर गेले. हा दुरावा शिंदे यांच्या शिवसेनेमुळे निर्माण झाल्याचा सूर मनसेमध्ये उमटला. त्याचे परिणाम म्हणजे विधानसभेच्या प्रचारात राज ठाकरे यांच्या टीकेच्या अग्रस्थानी शिंदे होते. पण त्याच राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी पोहोचले. दुसरीकडे दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे गौरव पुरस्कार प्रदान झाला. दुसऱ्या दिवशी पवारांनी शिंदे यांच्या केलेल्या सत्कारावरून ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली. भेटीगाठी आणि सत्कार समारंभाच्या या राजकारणाची सुरुवात दोन घटनांमधून ठळकपणे दिसली. पहिलं म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष आणि दुसरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण…
Published on: Feb 13, 2025 10:50 AM
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
