Brij Bhushan Singh | महाराष्ट्रात येणारच, रोक सके तो रोक लो – बृजभूषण सिंह
मी महाराष्ट्रात येणारच रोक सके तो रोक लो असं खा. बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण तापवलेले मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी आपण अयोध्या दौरा करणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan sharan singh) यांनी त्याला जोरदार विरोध केला. तसेच राज ठाकरे यांनी माफी मागावी, मगच अयोध्येत यावं, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. तसेच ही राज ठाकरे यांची धार्मिक यात्रा नाही, तर राजकीय यात्रा आहे. श्रीरामाचं दर्शन करायला यायचं असेल तर माफी मागा, असेही ते बोलले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा तुर्तास रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर ही हा वाद काही थांबलेला नाही. त्यानंतर आमदार रोहीत पवार (MLA Rohit Pawar) यांनी बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येतील असे म्हटलं होतं. दरम्यान आज त्यांना आपण महाराष्ट्रात गेलात तर मनसे विरोध करेल तेव्हा काय असे विचारण्यात आले होतं. त्यावर उत्तर देताना मी उंदीर नाही. महाराष्ट्रात येणारच, रोक सके तो रोक लो असे आवाहान त्यांनी मनसे कार्यकर्ते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे.
Published on: May 26, 2022 07:58 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
