AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं, आमचं घर फोडलं', काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं भरसभेत व्यक्त केली खदखद

‘फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं, आमचं घर फोडलं’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं भरसभेत व्यक्त केली खदखद

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 20, 2024 | 3:43 PM
Share

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्र्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, असा आरोप चव्हाण यांनी केला. बघा नेमकं काय म्हणाले मधुकरराव चव्हाण?

काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. ही आमची पण चूक समजतो. आमच्या धाकट्या मुलाच्या मित्रांनी फडणवीस यांना बोलावले होते. त्याने कारखाना चालवायला घेतला होता. सोलापूरला फडणवीस आले होते. ते दोघे तिथे होते. सोलापूरजवळ मी खंडोबाच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी समोरुन ताफा आला. मी विचारलं कोण आलं. तेव्हा कळलं की देवेंद्र फडणवीस आले आहेत. मी पण तिथे गेलो. त्यांची आणि माझी ओळख होतीच. मी उपाध्यक्ष असताना सर्वांशी माझे चांगले संबंध होते, असे मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले. पुढे त्यांनी असेही म्हटले, मी त्यांना म्हटले, साहेब तुम्ही चूक केली आहे. आमचं घर फोडून तुम्ही आम्हाला अस्वस्थ केले आहे. आम्हाला बदनाम केलं. त्याचं दु:ख आम्हाला आहे. तुम्हाला ते कधी तरी फेडावं लागेल, असे म्हणत भरसभेत मधुकरराव चव्हाण यांनी मनातील खदखद व्यक्त केली.

Published on: Sep 20, 2024 03:43 PM
Follow Us