Sachin Sawant | सोमय्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून नौटंकी करावी : सचिन सावंत
पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उतरवण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कायद्याच्या चौकटीत राहून नौटंकी करावी, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. सोमय्या दुसऱ्याची मालमत्ता तिसऱ्याचीच म्हणून दाखवतात, असा घणाघातही सावंतांनी केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावर मुश्रीफ यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

