भाजपनं दोन हजार लोकांवर करोडो रुपये खर्च केले, छोटू भोयर यांचा आरोप

महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर सर्व मतदारांच्या संपर्कात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार भोयर हे गायब आहेत अशा बातम्या पेरण्यात आल्या आहेत, असं छोटू भोयर म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर सर्व मतदारांच्या संपर्कात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार भोयर हे गायब आहेत अशा बातम्या पेरण्यात आल्या आहेत. ही सार्वजनिक निवडणूक आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ज्या लोकांशी संपर्क करायला हवा त्यांच्या संपर्कात मी आहे. कालपासून काही लोक अफवा पसरवत आहेत. जेव्हा त्यांचा लक्षात आलं की ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी केली, असं काँग्रेस उमेदवार छोटू भोयर म्हणाले आहेत.  भाजपनं ही निवडणूक कशी लढवावी,काँग्रेसनं ही लढवावी कशी हा प्रश्न आहे. कालच पत्रकांराशी बोलणार होतो. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ही निवडणूक मी निश्चितपणे जिंकल्यात जमा आहे. तीन दिवसांत काय होईल हे माहिती नाही. भाजपनं पंधरा दिवस 2 हजार लोकांच्यावर करोडो रुपये खर्च केले आहेत, असं छोटू भोयर म्हणाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI