Congress Andolan | सरकारी चौकीदार चोर है… राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिरातून करण्यात आली.
अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिरातून करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी “सरकारी चौकीदार चोर है”, “राम लल्ला का चंदा चोर कौन है?” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, श्रद्धास्थानांशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनामुळे नाशिकमधील काळाराम मंदिर परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही काँग्रेसकडून अशाच प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत.
Published on: Jul 07, 2026 02:25 PM
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरात
सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन

