‘त्या’ गावगुंड मोदीच्या अटकेवरून Nana Patole यांचा घुमजाव-TV9

मोदी नावाचा गुंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, जबाब नोंदवणे सुरू आहे, अशी माहिती नाना पटोलेंनी यावेळी दिली आहे. मात्र पोलिसांकडून कोणत्याही मोदीला अटक केली नसल्याचे सांगण्यात आले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 18, 2022 | 7:39 PM

मुंबई : मोदी नावाचा गुंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, जबाब नोंदवणे सुरू आहे, अशी माहिती नाना पटोलेंनी यावेळी दिली आहे. मात्र पोलिसांकडून कोणत्याही मोदीला अटक केली नसल्याचे सांगण्यात आले. नाना पटोलेंविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन करत आहे, त्यावरूनही नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला आहे. यातील काही जण कोरोना पॉझिटिव्ह होते, ते आंदोलनात आहेत, पंतप्रधान मोदींनी गर्दी टाळण्याचे, कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. हे पंतप्रधानांचं ऐकत नाहीत, मग कसले मोदी भक्त? असा सवाल पटोलेंनी विचारला आहे. तसेच मी जीवे मारेन असे म्हटलं नव्हतं, मारणं आणि जीवे मारणं यातला फरक कळतो का? असे म्हणत भाजप नेत्यांच्या बुद्धीची किव येते, अशी खिल्ली नाना पटोलेंनी उडवली आहे. मात्र मोदी नावाच्या गुंडावरून नाना पटोलेंनी घुमजाव केला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें