Karnataka मध्ये हिजाब घालण्यावरुन वाद पेटला; हिजाब आणि भगवी शाल काय आहे नेमका वाद ?
एकटी विद्यार्थींनी बुरखा घालून या आक्रमक झालेल्या मुलांच्या विरोधाला न जुमानता कॉलेजच्या दिशेने जाते. कॉलेजमधीलच काही जणही या विद्यार्थीनीली सुरक्षित आत घेऊन जाण्यासाठी तिच्या आजूबाजूला दिसून आले आहे. मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांच्या जय श्री रामच्या घोषणा कुठेही थांबलेल्या नाहीत.
कर्नाटक : 1 मिनिट 40सेकंदाचा कर्नाटकातील व्हिडीओ मंगळवारी (8 फेब्रुवारी, 2022) समोर आला आहे. एक मुलगी आपली दुचाकी कॉलेजच्या आवारात पार्क करते. यानंतर ही विद्यार्थीनी कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी इमारतीच्या दिशेनं चालू लागते. दरम्यान, या विद्यार्थीनीला घेराव घालण्याचा प्रयत्न होतो. भगवे शेले (saffron scarves) घेऊन असलेले काही विद्यार्थी या बुरखा (hijab) घातलेल्या विद्यार्थीनीसमोर जोरदार घोषणाबाजी करतात. जय श्री रामची नारे लगावले जातात. कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा (Karnataka Collage Students) आवेश प्रचंड असतो. विद्यार्थीही आपल्या भाषेत या विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीला उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसते. अल्ला हू अकबर असं म्हणत ही विद्यार्थीनीही तिला छेडणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसते. एकटी विद्यार्थींनी बुरखा घालून या आक्रमक झालेल्या मुलांच्या विरोधाला न जुमानता कॉलेजच्या दिशेने जाते. कॉलेजमधीलच काही जणही या विद्यार्थीनीली सुरक्षित आत घेऊन जाण्यासाठी तिच्या आजूबाजूला दिसून आले आहे. मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांच्या जय श्री रामच्या घोषणा कुठेही थांबलेल्या नाहीत.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
