मनसेमध्येच वॉर, अमित ठाकरे अन् महेश जाधव यांची ‘ती’ ऑडिओ क्लीप व्हायरल
अमित ठाकरे आणि मनसे पदाधिकारी महेश जाधव यांच्यातील संभाषण आता व्हायरल झाली आहे. मात्र व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची टिव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही. माथाडी कामगारांची बाजू लावून धरत असल्याने मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा महेश जाधव यांनी केला.
मुंबई, ९ जानेवारी २०२४ : अमित ठाकरे आणि मनसे पदाधिकारी महेश जाधव यांच्यातील संभाषण आता व्हायरल झाली आहे. मात्र व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची टिव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही. माथाडी कामगारांची बाजू लावून धरत असल्याने मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा मनसेच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष महेश जाधव यांनी केलाय. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे. तर माथाडी कामगार प्रकरणात अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचेही त्याच पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, मनसेकडून अधिकृत ट्विटरवरुन एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात मराठी कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आता महेश जाधव यांच्या गंभीर आरोपांनंतर आता अमित ठाकरे आणि महेश जाधव यांच्यातील फोनवरील संभाषण व्हायरल झालं आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

