सीएमच्या सभेत मंचावर बसणाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक
या सभेत मंचावर बसणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता सर्वांना ही चाचणी करावी लागणार आहे. औरंगाबादमध्ये सध्या कोरोनाचे 12 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला लाखो लोकांची गर्दी होणार, असे दावे शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात येत आहेत. राज्यातील वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी एकत्र येणं धोक्याचं ठरू शकतं. या सभेत मंचावर बसणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता सर्वांना ही चाचणी करावी लागणार आहे. औरंगाबादमध्ये सध्या कोरोनाचे 12 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. जिल्ह्यात 05 जून रोजी कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. सोमवारी 06 रुग्ण आढळले. यात शहरातील पाच आणि ग्रामीण भागातील एका रुग्णाचा समावेश आहे. याचबरोबर सक्रिय म्हणजेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 13 झाली आहे. यापैकी 12 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

