Kanhaiya Kumar | कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, दिल्लीत पोस्टरबाजी
AICC मध्ये 4 वाजता राहुल गांधी, के सी वेणुगोपाल वेणूगोपाल, यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी काँग्रेस प्रवेश करणार आहे. कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
काँग्रेसच्या राहुल ब्रिगेडमध्ये आज विद्यार्थी नेता अशी ओळख असलेला कन्हैयाकुमार प्रवेश करणार आहे. आज दुपारी 4 वाजता नवी दिल्लीतल्या काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात कन्हैयाकुमार हा कॉंग्रेसवासी होणार आहे तर या प्रवेशाच्या निमीत्ताने कार्यालयाबाहेर कन्हैया कुमारची पोस्टरबाजीही पाहायला मिळतेय. AICC मध्ये 4 वाजता राहुल गांधी, के सी वेणुगोपाल वेणूगोपाल, यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी काँग्रेस प्रवेश करणार आहे. कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ही बैठक शक्य तितकी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच काँग्रेसमधील बड्या नेत्यांनादेखील या भेटीची कल्पना नव्हती. खुद्द काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनादेखील कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांच्यात झालेल्या भेटीची खबर नव्हती. तर दुसरीकडे गुजरातमध्ये आमदार जिग्नेश मेवानी यांच्या रुपात काँग्रेसला तरुण आणि तडफदार चेहरा मिळणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

