Narendra Patil | औरंगाबाद घटनेतील गुंडांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, नरेंद्र पाटील यांची मागणी

कामगारांच्या जबरदस्तीने सह्या घेऊन राजीनामे घेतलेले आहेत. शिवाय राजीनाम्यानंतरचा मोबदला ही या गुंडांनी कामगारांना दिला नाही. म्हणूनच या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे रीतसर तक्रार करणार असल्याचं नरेंद्र पाटील म्हणाले.

पिंपरी चिंचवड : औरंगाबाद घटनेतील गुंडांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत जर संबंधित लोकांनी गुन्हे दाखल नाही केले तर पोलिसांनी सुमोटो दाखल करत मोक्का लावायला पाहिजे. हे गुंड माथाडी कामगारांना मारहाण करतात पिंपरी चिंचवडमधील टेल्को कंपनीत असे प्रकार घडल्याचा आरोप नरेंद्र पाटलांनी केलाय. ते पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. कामगारांच्या जबरदस्तीने सह्या घेऊन राजीनामे घेतलेले आहेत. शिवाय राजीनाम्यानंतरचा मोबदला ही या गुंडांनी कामगारांना दिला नाही. म्हणूनच या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे रीतसर तक्रार करणार असल्याचं नरेंद्र पाटील म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI