VIDEO : Pune | ओबीसी आरक्षणावरुन राज ठाकरेंचा मविआवर आरोप

पुणे महानगरपालिका निवडणूकीच्या तयारीला मनसे लागली आहे.  या महिन्यातील राज ठाकरे यांचा पुण्याचा हा 8 वा दौरा आहे. राज यांनी येथील 8 विधानसभा मतदारसंघातील शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवण्यावर सर्व पक्षांचं एकमत झालं आहे

VIDEO : Pune | ओबीसी आरक्षणावरुन राज ठाकरेंचा मविआवर आरोप
| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 2:32 PM

पुणे महानगरपालिका निवडणूकीच्या तयारीला मनसे लागली आहे.  या महिन्यातील राज ठाकरे यांचा पुण्याचा हा 8 वा दौरा आहे. राज यांनी येथील 8 विधानसभा मतदारसंघातील शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवण्यावर सर्व पक्षांचं एकमत झालं आहे. त्यावर तुमचं मत काय?, असा सवाल राज यांना करण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, असं सांगतानाच सरकारलाच आता निवडणुका नको आहोत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.