कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे. अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मंत्री भरणे यांनी थट्टा केली आहे का? असा सवाल उपस्थित झाला होता.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे. अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मंत्री भरणे यांनी थट्टा केली आहे का? असा सवाल उपस्थित झाला होता. पंचनामे करण्यासाठी एका शेतकऱ्याने मंत्री भरणे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेण्याऐवजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्या शेतकऱ्याला न भेटता त्यांच्या कारमध्ये जाऊन बसले. वरून “तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस आहे,” असेही सांगितले. शेतकऱ्याने ‘मामा तुम्ही शब्द दिला होता’ अशी आठवण करून दिली असता, भरणे यांनी “मी कोणताही शब्द दिला नव्हता, ज्यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले त्यांनाच पंचनामा करायला सांगा,” असेही ते म्हणाले.
हे व्हायरल झालेले प्रकरण अजून ताजे असतानाच दत्ता भरणे यांचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो मोटवानी यांच्यासोबतचा आहे. मोटवानी यांच्यावर कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांच्या जय अंबे मिल्समध्ये मोठ्या प्रमाणात धान घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी नाना पटोले यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
Published on: Jun 11, 2026 04:27 PM
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा

