AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : चेहऱ्यावर राग अन् संताप...फडणवीसांसमोर दादा भडकले, सज्जड इशारा देत म्हणाले, मला परत सांगायला लावू नका...

Ajit Pawar : चेहऱ्यावर राग अन् संताप…फडणवीसांसमोर दादा भडकले, सज्जड इशारा देत म्हणाले, मला परत सांगायला लावू नका…

| Updated on: Aug 08, 2025 | 2:26 PM
Share

अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच चहल यांना इशारा दिला आहे. इतकंच नाहीतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच आपली नाराजी व्यक्त केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सज्जड इशारा दिल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासाठी पोलीस स्टेशन शिफ्ट करायला सांगितलं असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तर रश्मी शुक्ला म्हणाल्या वरती गेलं.. म्हणजे कुठे चहलकडे गेलं का? असा सवाल करत अजित पवार यांनी चांगलंच खडसावलं आहे. मला परत सांगायला लावू नका, असं म्हणत अजित पवार यांनी म्हटलंय.

‘वेगवेगळ्या महत्त्वाच्या कमाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्यातून कसा मार्ग निघेल हे मी बघतो. मुख्यमंत्र्यांचीही तीच सवय आहे. इथं रश्मी शुक्ला बसल्या आहेत. आमचं कलेक्टर ऑफिस इतके दिवस झालेत. तिथे बंडगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा, असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं त्यानंतर त्यांनी रश्मी शुक्लांना सांगितलं.’, असं अजित पवार म्हणाले. पुढे दादांनी चहल यांचं नाव घेत मला पुन्हा सांगायला लावू नका, असं म्हणत सज्जड इशारा दिलाय.

 

 

Published on: Aug 08, 2025 02:26 PM