‘मॅडम चतूर, हिच तुमची औकात’; अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर
VIDEO | अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात घमासान, बघा कुणी कुणावर काय केला आरोप
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तक्रारीनंतर हे प्रकरण उजेडात आलं. याप्रकरणाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. त्यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. या दरम्यान, प्रियंका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्या चांगलाच ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्या संबंधित या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर अमृता फडणवीस यांनी देखील प्रियंता चतुर्वेदी यांच्या ट्वीटला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मॅडम चतूर, हिच तुमची औकात’, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

