MPSC | MPSCच्या रिक्त जागांबाबतची डेडलाईन संपली
सरकारमधील रिक्त पदांची माहिती जमा करण्याची डेडलाईन हुकली आहे. MPSC मार्फत भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते.
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा करण्यास सांगितली होती. मात्र, काही विभागांनी माहिती एमपीएससीला देण्यास दिरंगाई केल्याचं समोर आलं आहे. सरकारमधील रिक्त पदांची माहिती जमा करण्याची डेडलाईन हुकली आहे. MPSC मार्फत भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते. अजित पवार यांनी राज्य सरकारच्या रिक्त पदांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या 43 विभागांपैकी केवळ 10 विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा केल्याचं समोर आलं आहे. 43 पैकी 10 विभागांनी माहिती जमा केल्यानंतर इतर विभागांची माहिती जमा करण्यासाठी धावपळ सुरु असल्याचं दिसून आलं आहे.
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
