नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याची काळी कृत्ये समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या अशोक खरात याला भेटायला अनेक राजकीय नेते मंडळी येत होती. मात्र,यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दीपक केसरकर यांचे फोटो पुढे आले आहेत. मंत्रिमंडळातील ९ सहकारी अशाक खरातला भेटायला जायचे. यात आता राज्यातील सलग दोन सरकारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याचे समोर येत आहे. कालच्या महाड चवदार तळ्याच्या कार्यक्रमाला आणि आज लोकभवनातील दीक्षांत सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चेला पेव फुटले आहे.