Pune Ajit Pawar | मावळमध्ये पाहणी दरम्यान तराफ्याचं इंजिन बंद, अजित पवार अडकले; दुसऱ्या बोटीत रवानगी
सुरुवातीलाच अजित पवारांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका, अशी तंबी दिली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता.
पुण्याच्या कासारसाई धरणाच्या मधोमध पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला गेले असताना तराफ्याचे इंजिन अचानक बंद पडले. अखेर दुसऱ्या बोटीत रवानगी केल्यानंतर त्यांची सुटका झाली.
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कासारसाई धरणावर गेले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करत होते. यावेळी अचानक तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण ते सुरु होईना. शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली. त्यानंतर अजितदादा दुसऱ्या बोटीत बसले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

