Devendra Fadnavis : ‘कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता…’ देवेंद्र फडणवीसांचे शायरीतून शरसंधान, टीकाकारांनाही माफी

'दुनिया का हर शौक पाला नहीं जाता कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता,' अशी शायरी म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Jul 04, 2022 | 1:46 PM

मुंबई :  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शायरीतून अधिवेशनातून टीकास्त्र सोडलं. अवघ्या सभागृहाचं लक्ष या शायरीनं वेधलं गेलं. हे चित्र अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवसाचं. आज एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Shinde-Fadnavis)  सरकारची बहुमत चाचणी झाली. यावेळी बहुमतापेक्षा मोठा आकडा या नव्या सरकारनं गाठला आणि सभागृहातील आपलं वजन यानिमित्तानं दाखववून दिलं. दरम्यान, ‘दुनिया का हर शौक पाला नहीं जाता कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता,’ अशी शायरी म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना माफही केलं. तर बहुमत असूनही विरोधी बाकावर बसल्याचं त्यांनी वारंवार बोलून दाखवलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची   शायरी मात्र चर्चेत राहिली.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें