धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराचे निदान, Bell palsy आजार नेमका काय?
धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या नावाच्या दुर्मिळ आजाराचा निदान झालं आहे. रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे मला सलग दोन मिनिटंही बोलता येत नाही असं धनंजय मुंडे म्हणाले. त्यामुळे कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबाराला उपस्थित राहता आलं नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या नावाच्या दुर्मिळ आजाराचा निदान झालं आहे. रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे मला सलग दोन मिनिटंही बोलता येत नाही असं धनंजय मुंडे म्हणाले. त्यामुळे कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबाराला उपस्थित राहता आलं नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी स्वतः पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी असे म्हटले की, मला बेल्स पाल्सी आजार झालाय… माझ्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टर लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्या दरम्यान बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झाल्याची माहिती त्यांनी दिली तर त्या आजारावर सध्या रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्या आजारामुळे दोन मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक आणि जनता दरबार याला मला उपस्थित राहता आलं नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिली आहे. लवकरच आजारावर मात करून जनसेवेच्या कामात रुजू होईल, असेही त्यांनी म्हटले.
Bell palsy आजार नेमका काय?
बेल्स पाल्सी आजारामध्ये चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो.
चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा अंशतः पक्षाघात होतो.
बेल्स पाल्सीमुळे पापणी नीट बंद होऊ शकत नाही.
बेल्स पाल्सी हा फक्त प्रौढांनाच मधुमेह असलेल्या व्यक्तींनाच होतो.
योग्य औषधोपचार केल्यास दोन ते तीन महिन्यानंतर ही लक्षणं नाहीशी होतात.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

