Karuna Sharma Video : धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे ‘ते’ आरोप कोर्टाकडून मान्य, दर महिन्याला ‘इतकी’ पोटगी
धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे दावा करत करूणा शर्मा मागच्या काही वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये त्यांनी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत धनंजय मुंडेंवर त्यांनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाचा निकाल आला आहे. या प्रकरणात कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. करूणा शर्मांना प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. या मोठ्या बातमीनंतर मंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे दावा करत करूणा शर्मा मागच्या काही वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये त्यांनी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत धनंजय मुंडेंवर त्यांनी घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. यासह धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करूणा शर्मा यांनी केली होती. याबाबतच्या झालेल्या सुनावणीत कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान कोर्टाकडून देण्यात आलेल्या आदेशात धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाखाची पोटगी द्यावी. या खटल्याचा 25 हजाराचा खर्च धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना द्यावा, असेही म्हटले आहे.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
