Sarangi Mahajan Video : ‘स्वतःच्या पदासाठी आटापिटा… खरं रूप दाखवलंय आता राजीनामा द्या’, धनंजय मुंडेंच्या मामी आक्रमक
'धनंजय मुंडे यांनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावला आहे. धनंजय मुंडे यांनी जनतेचा रोष पाहून राजीनामा द्यायला हवा', असं सारंगी महाजन म्हणाल्या
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे. ‘धनंजय मुंडे यांनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावला आहे. धनंजय मुंडे यांनी जनतेचा रोष पाहून राजीनामा द्यायला हवा’, असं सारंगी महाजन म्हणाल्या. तर माझ्या ३६ गुंठ्यांचा घोटाळा झालाय. त्याबद्दल अंजली दमानिया यांना चांगलंच माहिती आहे. तर अंजली दमानिया यांना बदनामिया म्हणून धनंजय मुंडे यांनी खरं रूप दाखवलं आहे, असं म्हणत सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. तर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तर अंजली दमानिया यांचे आभार मानत सारंगी महाजन म्हणाल्या, ‘अंजली दमानियांना माझी खरी वस्तूस्थिती माहिती आहे. माझ्या ३६ गुंठ्यांच्या जागेमध्ये घोटाळा झालेला आहे. या धनंजय मुंडेला माझी ३६ गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होत? समोर आला असता तर आपसात व्यवहार मिटला असता. पण त्याने मला कोर्ट कचेरीत घेतलं आहे. मात्र यातून तोच बदनाम झाला आहे’, असं सारंगी महाजन म्हणाल्यात.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?

'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी

‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला

'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
