Dhananjay Munde on Pankaja Munde | ‘ताईंनी मविआच्या लेन्स लावल्या तर बरं होईल’-tv9
मुंबईतल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात परस्पर टोमणेबाजी सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चा
मुंबईःडॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांच्या रघुनाथ नेत्रालयाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडलं. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर सोडलेले शाब्दिक तीर मुंबईपासून बीडच्या गल्ल्यांपर्यंत चर्चेत आहेत.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगाचं औचित्य साधून पंकजा मुंडे यांनी ‘लेन्स’ शब्दावरून चांगलीच टोलेबाजी करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्या म्हणाल्या, ‘ ज्या व्यक्तीच्या अनुभवाच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस चांगल्या आहेत.. असे माननीय शरद पवार, ज्यांच्या लेन्सेस सर्वांना सूट करतील, जे सोबर, प्रेमळ वागतात, असे बाळासाहेब थोरात.. एक नवीन चेहरा, ज्यांच्याकडून इतरांना दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यांच्या लेन्सेसकडे युवक पहात आहेत असे आदित्य ठाकरे… आमचे शेजारी .. विलासराव देशमुख आणि मुंडे यांच्यातील मैत्रीची परंपरा असलेल.. अमित देखमुख… मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत पवार साहेबांच्या लेन्सेसमधून बघणारे… पवार साहेबांच्या लेन्समधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलंय… असे धनंजय मुंडे…माझ्या लेन्समधून बघत, काम करणाऱ्या पण खूप मेरीट असणाऱ्या भगिनी खा. प्रीतम मुंडे यांना मी अभिवादन करते.पंकजा मुंडे यांनाही व्यासपीठावरून टोमणा मारण्याची संधी धनंजय मुंडे यांनी सोडली नाही. तात्याराव लहाने यांच्या सामाजिक कार्याला सलाम करताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ पुढच्या येणाऱया दहा पिढ्यांनाही तात्याराव लहानेंचा अभिमान राहील. हे खरोखरच आमच्यासमोरचं आव्हान आहे. मी सांगेन की, अनेक जणांना दृष्टी देताना डॉ. साहेब आपण पावणे दोन लाख शस्त्रक्रिया केल्यात, मोफत केल्यात. त्यांच्या टीमनेही पावणे पाच लाख शस्त्रक्रिया मोफत केल्या. आता प्रभादेवीसारख्या दोन हजार स्र्वेअवर फूट रुग्णालयातही मोफतच करणार असाल तर पुढच्या पिढीसाठीही थोडं राखून ठेवा. थोडाफार व्यवहार पहावा, अशी मी विनंती करतो. मला कधीही व्यवहार कळला नाही. हे बाकिच्यांना माहिती नसला तरी माझ्या बहिणीला माहिती आहे… असा टोमणा धनंजय मुंडे यांनी मारला.
Published on: May 18, 2022 03:58 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
