देशमुखांना जबर मारहाणीनंतर चेहऱ्यावर लघवी अन् जनावराच्या चामडीसारखी पाठ सोलली; मृत्युलाही शहारे अशी क्रूर हत्या, फोटो-व्हिडीओ बघून होईल मन सुन्न
संपूर्ण महाराष्ट्र सुन्न होईल अशा पद्धतीने संतोष देशमुखांचा खून केला गेला. देशमुखांच्या हत्येवेळचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आरोपींच्याच मोबाईल मधून पोलिसांनी हस्तगत केले. ते इतके विदारक आहेत की या मारेकऱ्यांची तुलना राक्षसांशी करणे हा राक्षसांचा देखील अपमान ठरेल.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतका क्रूर खून कधीही झाला नसेल. चार शीटमध्ये पोलिसांनी संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळेचे जे फोटो व्हिडीओ जोडले आहेत ते पाहून कुठलाही मन असलेला माणूस हादरून जाईल. मृत्युलाही शहारे येतील अशी हत्या या जल्लादांनी संतोष देशमुखांची केली. आम्ही कसे एखाद्या माणसाला जनावरासारखं मारतोय याचं सारं शूटिंग स्वतः मारेकऱ्यांनीच केलं. कोयता, गॅस पाइप, क्लच वायर, लाकडी दांडा, तलवार सदृश्य हत्यार, लोखंडी रॉड, फायटर आणि कत्ती अशी हत्यार वापरली. मारहाण करून देशमुखांच्या चेहऱ्यावर लघवी करण्यात आली. शरीरात काहीच त्राण उरले नव्हते तेव्हा सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे हे देशमुखांच्या तोंडून बोलवण्यासाठी मारहाण झाली. पॅंट अंतरवस्त्र काढली गेली. मेलेल्या जनावराची चामडी काढावी तशी पाठ सोलण्यात आली. इतक्या क्रूर हत्येनंतरही कायदा आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याच्या माजात दुसऱ्या दिवशी बाप तो बाप राहील असे स्टेटस ठेवले गेले.
संतोष देशमुखांची हत्या कशाप्रकारे झाली याचा सारा वृत्तांत पोलिसांनी सादर केलेल्या चारशीटमध्ये आलाय. त्यात हत्येच्या वेळच्या मारेकऱ्यांच्या मोबाईल मधून जप्त झालेले व्हिडिओ आणि फोटोही आहेत एकूण 15 व्हिडिओ आणि 8 फोटोचा उल्लेख पोलिस तपासात करण्यात आलाय. ते फोटो व्हिडिओ दाखवूही शकत नाही इतके विदारक आहेत. मात्र ही हैवानी वृत्ती महाराष्ट्राला माहीत व्हावी यासाठी त्या फोटो व्हिडीओमधली भयावहता शब्दातून समजून घ्या.

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका

आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'

चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
