Video : उद्धव ठाकरेंच्या भाषणानं झोप उडाल्यानं राज ठाकरेंनी सकाळी-सकाळी सभा घेतली- दिपाली सय्यद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या सभेवर आता सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (dipali sayyad) यांनी तर राज ठाकरे यांच्या सभेची खिल्ली उडवली आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. शिवसेनेने (shivsena) झोप उडवली म्हणून आज सकाळी सकाळी सभा घेण्यात आली आणि घाबरलेला राज साहेबांचा भोंगा […]

आयेशा सय्यद

|

May 22, 2022 | 4:08 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या सभेवर आता सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (dipali sayyad) यांनी तर राज ठाकरे यांच्या सभेची खिल्ली उडवली आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. शिवसेनेने (shivsena) झोप उडवली म्हणून आज सकाळी सकाळी सभा घेण्यात आली आणि घाबरलेला राज साहेबांचा भोंगा आज पूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. आजच्या सभेत लोकांनी काय बघितलं असेल तुम्ही घरा घरात पत्रक देणार आहात. नंतर आंदोलन होणार. कार्यकर्त्यांवर केसेस होणार पण अमित ठाकरेला लपवून ठेवणार, अशी खोचक टीकाही दिपाली सय्यद यांनी केली. दिपाली सय्यद यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें