‘कहो दिल से धनुभाऊ फिरसे’, धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा स्वॅगच न्यारा, प्रचारास सुरूवात
कहो दिल से धनुभाऊ फिरसे" अशा आशयाचे बॅनर सध्या परळी, बीडच्या गाड्यांवर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरूवात झाली आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशातच प्रत्येक राजकीय नेत्यांकडून जोरदार मोर्चोबांधणी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. समर्थक आपापल्या नेत्यांचे नेत्यांचा प्रचार करताना दिसताय. बीडमध्ये ऋषिकेश सानप या मुंडे समर्थकाने चार चाकी वाहनावर मंत्री धनंजय मुंडे यांचे एक बॅनर लावले आहे. सध्या त्या बॅनरची बीडमध्ये सर्वत्र चर्चा होतेय. “कहो दिल से धनुभाऊ फिरसे” असा आशय या बॅनरवर छापण्यात आला आहे. “कहो दिल से धनुभाऊ फिरसे” असं बॅनर चक्क चार चाकी वाहनावर लावण्यात आले आहेत. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू करण्यात आल्याचे चित्र सर्वत्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे निवडणुकांपूर्वीच बीडमध्ये राजकीय वातावरण गरम झाल्याचे बघायला मिळत आहे.
Latest Videos
Latest News