मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच…
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दिशाच्या वडिलांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह काही व्यक्तींची नावे घेतली होती, तरी एफआयआरमध्ये आरोपी म्हणून कुणाचाही उल्लेख नाही. सामूहिक बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट करणे अशी कलमे लावण्यात आली आहेत.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नाही. परंतु, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या जबाबात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह रोहन रॉय, डिनो मोरिया, सूरज पांचोली, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची नावे घेतली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सामूहिक अत्याचार, आणि पुरावे नष्ट करणे अशी कलमे लावण्यात आली आहेत. ही केस तपासासाठी प्राथमिक कारवाई असल्याचे योगेश कदम यांनी म्हटले आहे.
तर, रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांना या प्रकरणातही क्लीन चिट मिळेल, जशी त्यांना सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मिळाली होती. न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. वडिलांच्या आरोपांनुसार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Sep 15, 2026 10:25 AM
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...

