Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
Disha Salian Case Hearing In Mumbai HIgh Court : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकेतून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेतून आदित्य ठाकरे आणि दिनो मौर्या यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
या याचिकेतून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा. सालियान कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्या प्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा. पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा. दिशाचं शवविच्छेदन करतानाचं चित्रीकरण करतानाचं चित्रीकरण आणि कागदपत्र समोर आणावे. आदित्य ठाकरेंसह बॉडीगार्ड, सुरज पांचोली, दिनू मौर्या आणि मुंबई पोलिसांचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे. दिशाचा फोन आणि लॅपटॉप दिशाचा प्रियकर रोहन रॉयकडे देण्यात आले आहेत. ते दिशाच्या कुटुंबाकडे देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

