AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde यांची जाहीर नाराजी; म्हणाल्या, 'मी सहनशील कन्या पण...' काय आहे प्रकरण?

Pankaja Munde यांची जाहीर नाराजी; म्हणाल्या, ‘मी सहनशील कन्या पण…’ काय आहे प्रकरण?

| Updated on: Sep 26, 2023 | 10:33 AM
Share

VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून नोटीस मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली जाहीरपणे नाराजी, म्हणाल्या, 'माझा कारखाना सोडून इतर सर्व कारखान्यांना आर्थिक अडचणी असलेल्या कारखान्यांना केंद्राकडून मदत'

पुणे, २६ सप्टेंबर २०२३ | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून नुकतीच नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान या कारखान्याच्या नोटीसवरून पंकडा मुंडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. माझा कारखाना सोडून इतर सर्व कारखान्यांना आर्थिक अडचणी असलेल्या कारखान्यांना केंद्राकडून मदत करण्यात आली मग माझाच प्रस्ताव का वगळला असा सावाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर मी सहनशील कन्या मात्र अजून किती दिवस सहन करायचा असे म्हणत कोंडी होण्याऐवढी मी लहान नाही, असे स्पष्टपणे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तर माझ्या संघर्षातून मार्ग काढेन, चुकीच्या गोष्टी करणार नाही. लोकांसाठी राजकारण करत आहे आणि ते करत राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Sep 26, 2023 10:32 AM