चंद्रकांतदादा सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, नाही तर तुमचेही कपडे फाटतील; राऊतांचा सल्ला
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिला आहे.
किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) पवईतील पेरूबाग (powai perunaugh) येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आहेत. एक दोन नाही ट्रकभरून कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ही सर्व कागदपत्रं मी आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे. तसेच आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटायला जात असून त्यांच्याकडेही ही कागदपत्रे देणार आहे, असं सांगतानाच चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात पडू नये. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिला आहे. सोमय्यांची एकूण 211 प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. त्यांनी एकूण सात साडेसात हजार कोटींचा हा घोटाळा केला आहे. त्यांनी खुशाल माझ्याविरोधात कोर्टात जावं, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

