Osmanabad | उस्मानाबादमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

उस्मानाबाद जिल्ह्यात 27 व 28 सप्टेंबर या 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसुल विभागाने तयार करून सरकारकडे पाठविला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसह नागरिकांच्या मदतीकडे मोठ्या आशेने नजरा लागल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात 27 व 28 सप्टेंबर या 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसुल विभागाने तयार करून सरकारकडे पाठविला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसह नागरिकांच्या मदतीकडे मोठ्या आशेने नजरा लागल्या आहेत. प्रत्येक शेतात जावून पंचनामे करण्यापेक्षा सँपल पंचनामे करा , मनुष्यबळ नसल्याने बांधावर जाऊन सर्व पंचनामे करणे शक्य नाही. अडीच लाख शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर विम्यासाठी अर्ज केलेत. विमा कंपनीकडे लोक नाहीत त्यामुळे रोज केवळ 9 हजार पंचनामे केले जातात. शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी विमा कंपनी यांची वाट पाहायची का ? शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी उपस्थिती केले मुद्दे. 6 लाख शेतकऱ्यांपैकी अडीच लाख अर्ज केले. एकूण साडेचार लाख लोक अर्ज करतील. Ndrf निकष बदला , नदीकाठी शेती माती वाहून गेली त्यात फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत केली जाते , बहुभुधारक शेतकऱ्यांना अन्याय होतोय हे बदलणे गरजेचे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI