Mumbai Avighna Fire | अविघ्न पार्क इमारतीला लागलेल्या आग भागाची ड्रोनद्वारे पाहणी सुरु

मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक असणाऱ्या लालबागमधील वन अविघ्न टॉवर्सला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या 19 व्या मजल्यावर ही आग लागली. मात्र, वाऱ्याच्या झोतामुळे आता ही आग जवळपास 20 व्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली असून आगीने अत्यंत भीषण स्वरुप धारण केले आहे.

मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक असणाऱ्या लालबागमधील वन अविघ्न टॉवर्सला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या 19 व्या मजल्यावर ही आग लागली. मात्र, वाऱ्याच्या झोतामुळे आता ही आग जवळपास 20 व्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली असून आगीने अत्यंत भीषण स्वरुप धारण केले आहे. अविघ्न टॉवर्स ही हायराईझ बिल्डिंग असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात बरेच अडथळे येत आहेत.

मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक असणारी वन अविघ्न ही इमारत अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. मध्य रेल्वेवरील करीरोड स्थानकातून ही इमारत अगदी सहजपणे दृष्टीस पडते. वन अविघ्न पार्क ही एक दुहेरी लक्झरी निवासी इमारत आहे. या इमारतीची उंची 247 मीटर इतकी आहे. निओ-मॉडर्न आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने डिझाइन केलेली ही इमारत अविघ्न इंडिया लिमिटेडकडून बांधण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI