Pune Hinjewadi | हिंजवडीत ड्रंक अँड ड्राइव्हचा कहर; मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
पुण्यातील हिंजवडी परिसरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या तरुणाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून चांगलाच चोप दिल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील हिंजवडी परिसरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या तरुणाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून चांगलाच चोप दिल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी कार थांबवत चालकाला बाहेर काढले. यावेळी चालकासह कारमधील इतर तरुणही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
कारमध्ये एकूण सहा तरुण प्रवास करत होते. सर्वजण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, संबंधित तरुणांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Published on: Jun 16, 2026 02:22 PM
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी

