‘लढाई ऐसे लढेंगे की, विरोधी भी…’, जयंत पाटील यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी
जयंत पाटील यांच्या मुंबईतील घराबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, काय आहे कारण?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या समन्समध्ये जयंत पाटील यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. पहिल्यांदा जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आला तेव्हा कौटुंबिक कारणांमुळे जयंत पाटील चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यांनी तेव्हा आणखी वेळ मागून घेतला होता. त्यानंतर आज जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहेत. दरम्यान, जयंत पाटील हे आज ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्यापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनात ही बॅनरबाजी केली आहे. जयंत पाटील यांना मिळालेल्या ईडी नोटीसनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नोटीसविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडूनही राज्यभर आंदोलन केलं जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

