सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले, दीपक कसेरकर यांनी केले कौतूक
राज्यात निकाल लागूनही सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेला घोळ अखेर संपला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:हून मुख्यमंत्र्याच्या रेसमधून बाहेर झाले आहेत. याबद्दल शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी त्यांचे कौतूक केले आहे.
महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले असून आता राज्याचे सरकार स्थापण करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण केंद्र जो निर्णय घेईल ते मान्य करु असे म्हटले आहे. यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. एक सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार मागे टाकले परंतू एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचाराला मान्यता दिली. त्यांना महायुतीसोबत पुढे आणखी जोमाने काम करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदेकडे यांच्याकडे असून ते तिला आणखी ताकदवान करतील असेही केसरकर म्हणाले.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

