मोरियाने तोंड उघडलं तर तुमचा मोरया होईल..; एकनाथ शिंदेंनी कोणाला फटकारलं?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कंत्राटावरून आज विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कंत्राटावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कंत्राटासाठी मराठी माणूस का दिसला नाही? डिनो मोरियाने जर तोंड उघडलं, तर अनेकांचा मोरया होईल, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला. विरोधकांनी भ्रष्टाचाराचे केलेले आरोप खोडून काढताना शिंदे म्हणाले, काँक्रीटचे रस्ते बनवले की 25 वर्षे दुरुस्तीची गरज पडत नाही. मग दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली काळ्याचं पांढरं करून पैसे लुटणारं काम कोणी केलं? आम्ही डीप क्लीन ड्राइव्हने रस्ते स्वच्छ केले, पण तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या.
मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या प्रकल्पातील अनियमितता आणि निधी गैरव्यवहाराचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया याचे नाव समोर आले असून, त्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. यावरून विरोधकांना लक्ष्य करत शिंदे पुढे म्हणाले, आम्हालाही बोलता येतं. मिठी नदीचा गाळ कोण काढतंय? कंत्राटदार कोण आहे? यांना फक्त डिनो मोरिया दिसला, मराठी माणूस का दिसला नाही? जर मोरियाने खुलासा केला, तर अनेकांचे बिंग फुटेल. आरोप करताना नीट विचार करा. जे स्वतः काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्यांवर दगड मारत नाहीत. भ्रष्टाचाराचे आरोप करताना आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. टेंडरच्या नावाखाली मुंबईला विकणारा वेंडर कोण, याचीही यादी काढा, मग मराठी माणसाबद्दल बोला.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

