मतदार यादीतील आरोपांवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण; केला मोठा खुलासा
मतदार यादीतील त्रुटींबाबत विरोधकांनी केलेले सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. दीपक कदम यांच्या चुकीच्या वयाच्या नोंदीसह, जयश्री मेहता आणि मोहन बिस्लावा यांची दुबार नावे तसेच नाशिकमधील एका घरात ८०० मतदारांच्या नोंदीवरील आक्षेपांवर आयोगाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया कायदेशीर असल्याचे आयोगाने म्हटले.
निवडणूक आयोगाने मतदार यादी संदर्भात विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. कांदिवली पूर्व मतदारसंघात मतदारांचे अयोग्य वय नोंदवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. दीपक कदम यांचे वय ११७ दाखवल्याची तक्रार होती, मात्र अद्ययावत यादीत त्यांचे अचूक वय ५४ वर्षे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. धनश्री कदम यांच्या वयाबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले.
मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर असून, नाव नोंदवणे, वगळणे किंवा दुरुस्ती करणे हे केवळ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांद्वारेच केले जाते, असे आयोगाने नमूद केले. यात कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीला हस्तक्षेप करता येत नाही. तसेच, मतदार नोंदणीसाठी आयोगाचे सुरक्षित पोर्टल वापरले जाते. नवीन ठिकाणी नोंदणी झाल्यावर पूर्वीच्या ठिकाणावरून नाव वगळण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसारच होते, त्यामुळे काही काळासाठी एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी दिसू शकते, असेही आयोगाने सांगितले. जयश्री मेहता आणि मोहन बिस्लावा यांच्या दुबार नावांवर तसेच नाशिकमध्ये एका घरात ८०० मतदारांच्या नोंदीवरही आयोगाने वस्तुस्थिती मांडली.
Published on: Oct 19, 2025 04:12 PM
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
