AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray | विरोधकांना काय टीका करायची ती करु द्या, काम केलं तरी टीकाच करतात

Aditya Thackeray | विरोधकांना काय टीका करायची ती करु द्या, काम केलं तरी टीकाच करतात

| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 7:11 PM
Share

विरोधी पक्षाकडे न देणंच योग्य आहे. ते काही ना काही आरोप-प्रत्यारोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण फोकस केलेला बरा. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनर्दन मुख्यमंत्र्यासोबत आणि आमच्या सोबत ठाम उभे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील, असं सांगतानाच विरोधकांचं काम आरोप-प्रत्यारोप करणं आणि जनतेला भरकटवणं आहे. तिकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांना अभिवानद केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. विरोधी पक्षाकडे न देणंच योग्य आहे. ते काही ना काही आरोप-प्रत्यारोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण फोकस केलेला बरा. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनर्दन मुख्यमंत्र्यासोबत आणि आमच्या सोबत ठाम उभे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.